(३४) आध्यात्मिक साधना

मुक्तीसाठी जरुरी नेमस्त जीवन । योग्य निद्रा, आहार, चलनवलन । ताब्यात राहील शरीर, मन । तरच होईल साधन॥
स्वाभाविक चंचल असे मन । कठीण त्याचे नियंत्रण । तरी असे शक्य प्रयत्नाने । त्याला ऐहिकातून बाजूस करणे ॥
मार्ग असाधारण का असेना । प्रखर मुमुक्षुत्व त्याची प्रेरणा । करण्या वाटचाल अध्यात्माची । धीर, चिकाटी गरजेची॥
ऐहिक इच्छा जी उपजावी । ती प्रथम तपासून पहावी । शक्य होईल तोवर टाळावी । मग कदाचित ती विरावी ॥
असेल गरज पुरविण्याची । तरच करावी पूर्ति तिची । कालांतराने इच्छा कमी होतील । अनासक्त मन हळूहळू होईल ॥
ध्यान, जप, सद्ग्रंथवाचन । आणि सत्संग नियमित साधन । मुमुक्षुत्व असावे जिवंत । योग्य वेळी होईल मोक्ष प्राप्त॥
साधनाकर्म आपले हाती । फळ सोडावे परमेश्वराप्रती । धीर न सोडावा कदापि । परमेश्वरकृपा होईल जेव्हां ॥
परमेश्वरी वेळापत्रक तारण्यासी । नसे माहीत आम्हां पामरासी । नशीबाने इच्छा असेल जरी । ठेवावे अनुसंधान ईश्वरी॥

About kishorkulkarni

I am happily retired and enjoy writing and communicating with friends.
This entry was posted in अध्यात्म and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

1 Response to (३४) आध्यात्मिक साधना

Leave a comment