श्रीमद्भगवद्गीतेचे काव्यरूप सार

मित्रहो,

श्रीमद्भगवद्गीतेचे काव्यरूप सार मी इथे सादर करीत आहे. त्याची मांडणी गीतेतील आध्यात्मिक तत्त्वांनुसार असेल. मी कांही उपजत कवि नाही. त्यामुळे माझी काव्यरचना ही ओबडधोबडच असेल. तरी गोड मानून घ्यावी.

हा पहिला प्रयत्न.

भक्ति
भगवंतासी शरण । अहंकाराचे विघटन । आवडनिवड सोडून । शारीर ओळख विसरून ॥
भक्ति तीच अव्यभिचारी । द्वैतापलीकडे खरोखरी । भक्त आणि भगवंत । असे नाही द्वैत ॥
स्वत्वाचे विसर्जन । आत्मरूपी तल्लीन । तीच भक्ति निर्मळ । भावावाचुनी निष्फळ ॥
नाशवंत शरीर ऐहिक । इच्छा त्याच्या बंधक । विचार सोडून जगाचे । ध्यान स्वस्वरूपाचे॥
यावाचुनी आगळी । मुक्ति नाही वेगळी । मोक्ष नसे मृत्युपश्चात । याची देही साक्षात ।

माया असे भ्रामक । परमेश्वराची आंगिक । पाडी भूल मनुष्यासी । जखडुनी विषयसुखासी ॥
सात्त्विक, राजसिक । वा तामसिक स्वाभाविक । मायेपासूनी निर्माण । त्रिगुण यासी कारण ॥
मात यावर अशक्यच । असे उपाय एकच । पूर्ण शरणागति । आणि भगवंतांची भक्ति ॥

मार्ग असती वेगवेगळॆ । मुक्तीसाठी सांगितले । असे मात्र भक्तिमार्ग । एकच राजमार्ग । ॥
जीवनविषयक दृष्टिकोण । सर्वस्वी बदलून । सोडूनि इच्छा सकळ । मन असावे निर्मळ ॥
सामान्यांची संगति । टाळावी यथाशक्ति । षड्रिपूंवर करावी मात । आणि व्हावे विरक्त ॥
ना साहित्य ना पद्धति । ना उपचार म्हणजे भक्ति । एकाग्र मन निर्मळ । भगवत्स्वरूपी केवळ ॥
भौतिकापलिकडे अनंत । असे सर्वव्यापी भगवंत । उपचार आत्यंतिक । काय त्याला कौतुक ॥
मन प्रपंची व्यग्र । त्यासी करण्या एकाग्र । भगवत्स्वरूपी निव्वळ । उपचारांचा हेतु केवळ ॥
तरी नसावी चिंता । उपचारांची योग्यायोग्यता । देव पाही भक्ताठायीचा । भाव त्याचे पायींचा ॥
हात व्यस्त उपचारात । मन फिरे त्रिभुवनात । न होई प्राप्त । पारमार्थिक इच्छित ॥
जीवनहेतु मात्र दैवी । नको विषयसुखाच्या उठाठेवी । नसावी पूजा सहेतुक । खरी भक्ती निर्हेतुक ॥

 

About kishorkulkarni

I am happily retired and enjoy writing and communicating with friends.
This entry was posted in अध्यात्म. Bookmark the permalink.

9 Responses to श्रीमद्भगवद्गीतेचे काव्यरूप सार

  1. natujaya says:

    भक्तिमार्गात सामान्यांची संगति यथाशक्ति टाळणे खरंच योग्य आणि आवश्यक आहे ?

    • सामान्य लोक स्वत: ऐहिकात मग्न असल्यामुळे, त्यांच्या संगतीत साधकाचे मन विचलित होऊन त्याची आध्यात्मिक प्रगति खुंटू शकते. अर्थात हे साधकांसाठी. जे ज्ञानीजन इतरांच्या उद्धारासाठी असतात, त्यांना हे लागू नाही. त्यांनी सामान्यजनात राहून त्यांच्या उद्धारासाठी त्यांना मदत केली पाहिजे. आणि आत्मस्वरूपाचा अनुभव आलेल्या ज्ञानीजनांना सामान्यांच्या संगतीमुळे अधोगतीचा धोका नसतो.

      • natujaya says:

        सामान्य लोकात राहून मन विचलित न होण्याचे प्रयत्न यथाशक्ती करत राहणे ही साधना होय . हे प्रयत्न स्वानुभव ,अभ्यास यातून करता येणे शक्य आहे असे मला वाटते . असे साधक मी पाहिले आहेत . असेच साधक माझ्या सारख्या अतिसामान्याचे पथदर्शक ठरतात .

      • सामान्य प्रापंचिकांमध्ये राहून अलिप्त राहाणे ज्याला जमेल तो असामान्य साधकच म्हणावा लागेल! सामान्य साधकाला ते जमणे जरा अवघडच. तेव्हां त्याने शक्यतोवर आपला इतरेजनांबरोबरचा सहवास कमीतकमी ठेवावा. याबाबतीत एक मुद्दा लक्षात घेण्याजोगा हा की याचा अर्थ असे नव्हे की त्याने घर सोडून जावे. पण त्याने टाळता येईल तितके सामूहिक व्यवहार टाळावेत.

  2. Jane says:

    I needed to thank you for this excellent read!! I certainly loved every little bit of it.
    I have got you book-marked to check out new stuff you

  3. my site says:

    Hey there would you mind letting me know which web host you’re
    working with? I’ve loaded your blog in 3 different web browsers and I must say this blog loads a lot
    faster then most. Can you suggest a good web hosting provider at a honest
    price? Thank you, I appreciate it!

  4. Jack says:

    I have been browsing on-line more than three hours
    lately, but I by no means found any interesting article like yours.
    It’s lovely value sufficient for me. In my view, if all webmasters and bloggers made excellent content as you
    probably did, the internet will be a lot more helpful
    than ever before. http://www.yahoo.net

Leave a comment