Category Archives: अध्यात्म

(३४) आध्यात्मिक साधना

मुक्तीसाठी जरुरी नेमस्त जीवन । योग्य निद्रा, आहार, चलनवलन । ताब्यात राहील शरीर, मन । तरच होईल साधन॥ स्वाभाविक चंचल असे मन । कठीण त्याचे नियंत्रण । तरी असे शक्य प्रयत्नाने । त्याला ऐहिकातून बाजूस करणे ॥ मार्ग असाधारण का … Continue reading

Posted in अध्यात्म | Tagged , , , , , , | 1 Comment

(३३) आध्यात्मिक वृत्ति

जीवन अपुले वर्षे कित्येक । अनुभव त्यात अनेकानेक । वाटे सर्व कांही समजले  । शहाणपण पूर्ण आले ॥ पण ते ज्ञान केवळ ऐहिक । इंद्रियांनी मिळविलेले प्रापंचिक । नसे माहीत जन्माआधीचे । ना मृत्यूनंतरचे ॥ बलवान बंध भावनांचा । घटना, … Continue reading

Posted in अध्यात्म | Tagged | Leave a comment

(३२) आत्मा

सजीव प्राणी पृथ्वीवरी । आत्मा शरीरधारी । तो आत्मा अंश परमात्म्याचा । सर्व द्वैतापलीकडचा ॥ शरीर व अहंकाराचे । नानाविध प्रकारचे । जोखण्या अनुभव द्वैताधिष्ठित । मन बनविले संकुचित ॥ कांही अनुभव आवडती । दुसरे कांही नावडती । मनाचा धर्म … Continue reading

Posted in अध्यात्म | Tagged , , | Leave a comment

(२९) मुक्ति कशी मिळेल?

मुक्ति हे ध्येय एक । मार्ग असती अनेक । निवड करावी त्याची । परिस्थिती पाहून स्वत:ची ॥ असेल देणगी बुद्धीची । धरावी कास ज्ञानमार्गाची । राहावे ईश्वरसंन्निधानी । दृढभाव एकतत्त्वी धरोनी ॥ बहुसंख्य मुमुक्षु सामान्य । जगती जीवन सर्वसामान्य । … Continue reading

Posted in अध्यात्म | Tagged , , , , , , , | Leave a comment

(२८) मुक्ति कोणाला?

सर्वसामान्य आपुली दृष्टि । दाखवी वैविध्यपूर्ण सृष्टि । जाणी सर्वत्र नानात्व । जरी असे मूलभूत एकत्व ॥ होई जाणीव असामान्य जेव्हां । तीच मुक्ति सशरीर तेव्हां । ती सार्वभौम दैवी कृति । जिच्यामागे ईश्वरी शक्ति ॥ होईल तशी जाणीव कोणा … Continue reading

Posted in अध्यात्म | Tagged , , , , , , | Leave a comment

(२७) मुक्ति

शरीरेंद्रियांची रचना । देण्या अनुभव नाना । स्पर्श मोरपिशी वा टाचणीचा । सुखाचा किंवा दु:खाचा ॥ द्वैताधिष्ठित इंद्रियानुभव । असे अटळ वास्तव । पण का घ्यावे मनावर । सदैव झोके खाली वर ॥ इंद्रियानुभव क्षणभंगुर । येती, पण जाती सत्वर … Continue reading

Posted in अध्यात्म | Tagged , , | Leave a comment

(२६) पुनर्जन्म

आत्मा धारी शरीर नाशवंत । अनुभवण्या जग शोभिवंत । अनुभवांची आस न सरे। जरी शरीरी शक्ति नुरे ॥ मृत्युसमयी असती वासना । घ्यावा जन्म पुन:पुन्हा । जगी पुनरपि आत्म्याने यावे । घेऊनी शरीर ताजे नवे ॥ गीतेमध्ये सांगितले समय । … Continue reading

Posted in अध्यात्म | Tagged , , , | Leave a comment