(२७) मुक्ति

शरीरेंद्रियांची रचना । देण्या अनुभव नाना । स्पर्श मोरपिशी वा टाचणीचा । सुखाचा किंवा दु:खाचा ॥
द्वैताधिष्ठित इंद्रियानुभव । असे अटळ वास्तव । पण का घ्यावे मनावर । सदैव झोके खाली वर ॥
इंद्रियानुभव क्षणभंगुर । येती, पण जाती सत्वर । मग का हवे असावे सुख । आणि नको असावे दु:ख ॥
सुखाची अनावर इच्छा । व दु:खाची अनिच्छा । यातूनच जन्म पुन:पुन्हा । अविरत चक्र फिरवी आम्हा ॥
इच्छा कसल्याही नसाव्या । मृत्युसमयी ज्या मनुष्या । न लागे यावे परतुनी । फिरूनी नवीन जीवनी ॥
इच्छामुक्ति मुक्ति खरी । याची जीवनी, याची शरीरी । इच्छाविरहित मन शांत । जीवनध्येय मौल्यवान ॥
त्यागावी ओळख मर्यादित । शारीर द्वैताधिष्ठित । कर्तेपणा नाही मजकडे । तो सर्वस्वी त्रिगुणांकडे ॥
मग व्हावे विलीन एकरूप । परमात्म्याशी सर्वरूप । तीच मुक्ति जिवंत । आणि तसेच मृत्युपश्चात ॥

Advertisements

About kishorkulkarni

I am happily retired and enjoy writing and communicating with friends.
This entry was posted in अध्यात्म and tagged , , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s