(२२) अकर्तेपणा

मी केले कर्म अमुक । म्हणून मिळावे फळ तमुक । हा अभिमान कर्तेपणाचा  । त्यामुळे बंध कर्माचा ॥
त्याउलट भाव अकर्ता । परमेश्वरच कर्ता करविता । मी निव्वळ निमित्तमात्र । हेतुपूर्ति त्याचीच मात्र ॥
फळाला ना मी जबाबदार । माझा असे फक्त हातभार । जसे ते इतर अनेकांचे । मोठे चित्र परमेश्वराचे ॥
अकर्तेपणा तत्त्व आध्यात्मिक । न की ऐहिक । कर्माची जबाबदारी कर्त्यावर । कुटुंबसमाजात, कायदेशीर ॥
केला खून, चोरी । म्हणे मी नाही कर्ता, तरी । कायद्याने तोच जबाबदार । शिक्षा लागे भोगावी जबर ॥
“मी” नसे कोणी एक । ती एक कृत्रिम ओळख । कृति अनेक शरीरभागांची । क्लिष्ट प्रक्रियेनंतरची ॥
कर्तेपणा सोयीस्कर । चांगल्यावाईट परिणामानुसार । हवा तेव्हां घ्यावा । नको तेव्हां टाळावा ।
आपण बाहुले कळसूत्री । भगवंताहाती दोरी । मनाविरुद्ध असती जरी । कित्येक कृत्ये घडती तरी ॥
शरीर करी कृति जरी । अकर्ता तो तरी । बसे निवांत जेव्हां कृतिविणा । इतरांच्या कृतीत पाही कर्तेपणा ।
अकर्तेपणा होई स्थिर तेव्हां । वासना जाती सर्वथा जेव्हां । दोन बाजूंचे नाणे जसे । एकीवाचून दुसरी नसे ॥

Advertisements

About kishorkulkarni

I am happily retired and enjoy writing and communicating with friends.
This entry was posted in अध्यात्म and tagged , , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s