(१८) कर्मयोग – १

स्वार्थ जीवनाचा चालक । मग कलह झगडे मारक । बिघडून जाती नातीगोती । तुटली कांच, होई ना दुरुस्ती ॥
स्वार्थ न सुटे योग्य वेळी । नंतर व्यर्थ दया अवेळी । करायचे ते या क्षणी । भूत भविष्य विसरुनी ॥
कौरवपांडवांचे भांडण सदैव । युद्धसमयी अर्जुनाची कणव । सर्वथा अयोग्य अवेळी । युद्धच योग्य त्या वेळी ॥
फलाशा नसावी यत्किंचित । करावे कर्तव्यकर्म प्राप्त । हाच कर्मयोग खरा । मग न सतावे भीति जरा ॥
इच्छा जशी असेल । त्यानुसार कर्म सुचेल ।  हाच कार्यकारणभाव सकळ । फलाशा असे ज्याचे मूळ ॥
न होय जरी इच्छापूर्ति । करावे लागती प्रयत्न पुढती । हेचि होय बंधन कर्माचे । अविरत चक्र जीवन मृत्यूंचे ॥
जरी न उरती इच्छा किंचित । मृत्युसमयी अकल्पित । मग न येणे पडे परत । पुढील जन्मी या जगात ॥

कल्पना करावी फळाची । दिशा ठरविण्या प्रयत्नांची । मग दृष्टि कर्मावर असावी । आशा फळाची न ठेवावी ॥
संस्कारांनी मन बुद्धि घडती । तैसी अपेक्षा फळाची करिती । नसे अचूक जे अपेक्षित । फळ उपजे अकल्पित ॥
अर्पण करावी कृति । जीवनाच्या यज्ञात आहुति । अनुभव हे फलित नैसर्गिक । नसावे त्याचे सुखदु:ख ॥
त्यागावे कर्माचे फळ । न सोडावे कर्म सकळ । सृष्टिकर्त्याची योजना असे । तिच्यात कर्म चपखल बसे ॥
जरी आत्मज्ञान व्हावे । तरी कर्म करीत रहावे । ज्ञानीजन जसे करिती । तसेच सामान्यजन वर्तती ॥

Advertisements

About kishorkulkarni

I am happily retired and enjoy writing and communicating with friends.
This entry was posted in Spirituality and tagged , , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s