(१७) कर्मबंधन

इच्छा बांधे फळ कर्माशी । शास्त्रे म्हणती कर्मबंध त्यासी । हवे फळ स्वादिष्ट । करावी लागे कृति विशिष्ट ॥
इच्छा हे जिवंत बियाणे । पेरल्यावरी फळ भोगणे । कडू, आंबट वा मधुर । केवळ निसर्गनियमानुसार ॥
जसे भाजलेले बी पेरावे । ते कदापि न रुजावे । तैसे कर्म करावे प्राप्त । परंतु नसावे फलासक्त ॥
कार्यकारणसंबंध मनाची कल्पना । ईश्वरेच्छेने घडे घटना । हा भाव जो मनी धरे । त्यासी कर्मबंध नुरे ॥
इच्छा कधीही न संपती । मृत्युसमयी पाठ न सोडती । यावे लागे पुन्हा जगती । इच्छांची करण्या पूर्ति ॥
न होय कामना कांही । कर्मबंध बंधक नाही । मग न यावे पडे परत । पुढील जीवनी मृत्युपश्चात ॥

Advertisements

About kishorkulkarni

I am happily retired and enjoy writing and communicating with friends.
This entry was posted in अध्यात्म and tagged , , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s