(९) सृष्टि आहे भ्रामक

जन्माआधी नव्हतो ना मी । मृत्यूनंतर असेन का मी । दरम्यान जीवन भ्रामक । बुडबुड्यासम क्षणिक ॥
चित्रपटाआधी पडदा कोरा । संपल्यावर पुन्हा कोरा । मध्ये कहाणी मायावी । कला नाटकी सर्वस्वी ॥
पडद्यावरील घटना मनभावक । निष्कारण सुखदु:खकारक । प्रेक्षक मात्र अनुभविती । नानाविध अनुभूति ॥
नसती इतरांसारखे अज्ञ । मोजके प्रेक्षक स्थितप्रज्ञ ।  खरा “मी” अस्पर्शित । पडद्यावरील मिथ्या घटित ॥
किंवा आपण नटनर्तक । हे नाट्य जीवननामक । नाही आपण कर्ता भोक्ता । निव्वळ बाह्यभाव दर्शविता ॥
कर्ता करविता सृष्टिपालक । नाटकाचा लेखक-दिग्दर्शक । निर्विकारपणे कर्म करावे । कशाला मनावर घ्यावे ॥

Advertisements

About kishorkulkarni

I am happily retired and enjoy writing and communicating with friends.
This entry was posted in अध्यात्म and tagged , , , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out / Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out / Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out / Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out / Change )

Connecting to %s