(७) सृष्टिकर्ता व सृष्टि

एकचि सत्य केवळ । असे परब्रह्म मूळ । नानाविध रूपे धरी । जरी क्षणभंगुर परी ॥
ज्ञाता ज्ञेय म्हणून । स्वत:सीच विभागून । मायेचा खेळ मांडून । रिझवी आपुले मन ॥

सृष्टि असे नश्वर । जाईल विरून जणू धूर । सृष्टिकर्ता तो अव्यक्त । सृष्टीच्या परे शाश्वत ॥
सागरावरील लहरी । भासती खरोखरी । केवळ पाणीच मूळ जरी । उचंबळे क्षणभरी ।

वांझ स्त्री कथेत असावी । पण तीस मुले व्हावी । अशा कथेचे मंथन । निव्वळ हेतुहीन ॥
तद्वत सृष्टि नि:सत्त्व । नसे तीस अस्तित्त्व । का कष्टवावे स्वत:सी । तिला समजण्यासी ॥

स्वप्नातील जग आगळे । असे संवेदन वेगळे । जागेपणीची सृष्टि । आपलीच एक दृष्टि ॥
साक्षीभाव केवळ शुद्ध । नको इच्छा अशुद्ध |  न मानावे सुखदु:ख । या ऐहिक जीवनाचे  ॥

Advertisements

About kishorkulkarni

I am happily retired and enjoy writing and communicating with friends.
This entry was posted in अध्यात्म and tagged , , , , , . Bookmark the permalink.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s