(४) आध्यात्मिक जीवनपद्धति

यज्ञ, तप, दान । हे आध्यात्मिक साधन । या काळी अर्वाचीन । घ्यावा अर्थ जाणून ॥
यज्ञ नव्हे होमहवन । ते विहित कर्माचरण । कर्म, फळ करावे अर्पण ।  भगवच्चरणी लीन होऊन ॥
तप नव्हे तपश्चर्या । उभे राहुनी एक पाया । वा करूनी वायुभक्षण । कितीक वर्षे वर्षामागून ॥
तप असे आचरण । कायावाचामने करून । सर्व भगवन्मय करून  । प्रपंच बाजू सारून ॥
स्वकमाई असो कमीअधिक । द्यावा हिस्सा एक । गरजूस एका शोधावे । निरपेक्षपणे द्यावे ॥

यज्ञ, तप, दान । यांचे प्रकार तीन । सात्विक जाणावा योग्य । राजसिक, तामसिक अयोग्य ॥
सात्विकात स्वार्थ नसे । हेतु दैवी असे । केवळ प्राप्त कर्म हा भाव । असे फळहेतूचा अभाव ॥
राजसिक कर्म स्वार्थापोटी । सर्वस्वी ऐहिकासाठी । लक्ष पूर्ण फळावर । मुख्य भाव अहंकार ॥
तामसिक अज्ञानमूलक ।  बहुधा हानिकारक । माहीत नसे चूकबरोबर । आळस, निद्रा शिरजोर ॥

About kishorkulkarni

I am happily retired and enjoy writing and communicating with friends.
This entry was posted in अध्यात्म and tagged , , , , , , . Bookmark the permalink.

Leave a comment