वर्तमानात प्राप्त कर्म करावे

योग्य वेळ निघून गेली । योग्य कृति चुकली । नंतर ती करणे कैसे । तुटली काच सांधणे जैसे ॥
स्वार्थाधिष्ठित मनुष्यजीवन । नित्य झगडे व भांडण । नातीगोती तुटल्यावरती । कशी व्हावी दुरुस्ती ॥

भूतकाळ तो असे संपला । अर्थहीन व मेलेला । केवळ आठवणी वांझोट्या । वाळूवरील रेघोट्या ॥
दूध चुकून जरी सांडावे । मग उपयोगा कैसे यावे । मागे जे गेले घडून । का न जावे ते विसरून ॥

स्वर्गनरकाच्या संकल्पना । नको पापापुण्याच्या विवंचना । अनुसरावा स्वधर्म । करीत जावे प्राप्तकर्म ॥
कोण पाही भविष्यकाळ । वाटाड्या असमर्थ भूतकाळ । पूर्वसंस्कार व  भविष्यकयास । कारण गोंधळास ॥
वास्तव वर्तमानाचे स्वीकारावे । भगवंतासी स्मरावे । मग योग्य कर्म करावे । भूतभविष्यात न डोकावावे ॥

नातेसंबंध बुडबुड्यासमान । क्षणात जाती विरून । कर्मात जर येती आडवे । बाजूस त्यांसी सारावे ॥
अर्जुन जेव्हां गोंधळला । भगवंतासी शरण गेला । सांगितले हे ज्ञान हितकर । प्राप्तकर्म हेच श्रेयस्कर ॥

Advertisements

About kishorkulkarni

I am happily retired and enjoy writing and communicating with friends.
This entry was posted in अध्यात्म and tagged . Bookmark the permalink.

2 Responses to वर्तमानात प्राप्त कर्म करावे

  1. gisext says:

    translation please

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

w

Connecting to %s